सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात चक्क रक्तांची धुळवड खेळली जाते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना ? पण हे खरं आहे. मोहोळ मधील भोयरे गावात दोन गटामध्ये एकमेकांवर दगडफेक करत धुळवड खेळण्याची जुनी परंपरा आहे. गावातील एक गट भवानी देवीच्या मंदिरावर थांबतो आणि दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो.
शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी धुळीवडीला दिवसभर येथील तरुण दगड-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात. एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव केला जातो. यामध्ये अनेक तरुण जखमी देखील होतात. मात्र हे जखमी लोक दवाखान्यात किंवा डॉक्टरकडे न जाता देवीच्या अंगाऱ्यावर नीट होतात. जेवढे जास्त लोक जखमी होतील त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात.
दोन गटांनी एकमेकांना दगड गोटे भिरकावत साजरी करतात होळी…
मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात शेकडो वर्षांपासून दगडांची होळी खेळली जाते.गावातील नागरिकांचा एक गट गावातील मुख्य चौकात उभारतो तर दुसरा गट जगदंबा देवी मंदिरावर उभारतो आणि दोन गटात एकमेकांकडून दगड गोट्यांचा वर्षाव केला जातो.
धुलिवंदना दिवशी ही दगडांची होळी खेळली जाते. संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या या होळीसाठी गावातील तरुण सकाळ पासून दगड गोटे गोळा करतात.काही तरुण दगड गोटे घेवून मंदिरावर थांबतात तर काही तरुण दगड गोटे घेवून मंदिरा खालील मुख्य चौकात थांबतात. आणि 5 वाजता दगड गोट्यांची होळी सुरु होते.
चौकट –
एक मेकांवर तुफान दगड फेक केली जाते.जास्त व्यक्तीला दगड लागले तर गावात पाऊस काळ जास्त होतो. कुणाला दगड नाही लागला तर गावात दुष्काळ पडतो अशी गावातील लोकांची धारणा आहे.
राजा रामदेवराय यादव यांच्या काळात हेमाड पंथी पद्धतीचे जगदंबा देवी चे मंदिर गावात असल्यापासून ही होळी खेळली जात असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
चौकट –
जेसा देश वैसा भेस म्हटल्याप्रमाणे भारतात प्रत्येक सहा किलोमीटर वर सांस्कृतिक भाषा आणि तेथील समाज रचना बदलत असते. आणि विषेश म्हणजे अश्या गाव खेड्यांमध्ये होणाऱ्या उत्सव साजरा करण्याची विशेष पद्धत ही त्या गावाला वेगळी बनवते. म्हणूनच विविधतेने नटलेला भारत हा आपल्या एकतेत कसा वेगळा आहे हेच जगाला भारताकडून जगाला शिकण्यारखे आहे.