सोलापूर :
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक (दि. १६) रविवारी रोजी सायंकाळी आठ वाजता, दमानी नगर बचुटे उद्यानात संस्थेचे संस्थापक सचिन शिराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक बैठक संपन्न झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बैठकीस सुरुवात करण्यात आली. यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी विवेक भांडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष राज पांढरे, योगेश जाधव सचिव सुनील भांडेकर, सनी बनसोडे खजिनदार संदेश काशीद अशी निवड करण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

.