man marathi news,
सोलापूर प्रतिनिधी –
मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde) दौरा अन् लाडकी बहिणीच्या बांगड्या प्रशासनाने फोडल्या.!
त्या महिलेला साडीचोळी व आर्थिक मदत देत शिवसेना उबाठा पक्षाने दाखवली अनोखी गांधीगिरी.. (Shivsena UBT)
सोलापूर प्रतिनिधी – काल मुख्यमंत्री पंढरपूरात Pandharpur अचानक दौरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाधव नामक एक गरीब अबला महिला “चुडा” विकत होत्या. मुख्यमंत्री आलेत म्हणत येथिल प्रशासनाने त्या जाधव नामक अबला महिलेच्या जवळ असलेले साहित्य काठ्या घालुन अक्षरश चक्काचूर केले.
एकप्रकारे या गरीब महिलेची या दौर्यामुळे क्रूर थट्टाच झाली. आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray )पक्षाच्या वतिने सडेतोड वक्ते रणजित बागल यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह त्या स्थानी जावुन त्या महिलेची आस्थेने विचारपूस केली व त्या महिलेला सन्मानाने साडीचोळी व आर्थिक मदत दिली.
यावेळी बोलताना रणजित बागल म्हणाले की ” शासन लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojna) मोठा गाजावाजा करते,पण आज मुख्यमंत्री येणार म्हणुन याच हातावर पोट असणाऱ्या महिलांवर आज मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाने काठ्या चालवल्या आहेत,यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, प्रशासनाचा निषेध करावा तितका कमीच आहे, पुढे बोलताना योजना बहिणीची काढली आहे मात्र बहिणीलाच सावत्र वागणुक देण्यात आली आहे, अशी टिका देखील बागल यांनी केली..
यावेळी बागल यांचेसह सामाजिक कार्यकर्ते पार्थ बेणारे,युवासेनेचे प्रणित भैय्या पवार,हर्षद मोरे यांचेसह इतर उपस्थित होते.