तेलंगणा मध्ये ज्याप्रमाणे बलात्कार प्रकरणातील आरोपींना गोळ्या घालून एन्काऊंटर केले किंवा तातडीने फास्ट ट्रॅक कोर्ट नेमून बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली.
सोलापूर प्रतिनिधी –
मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर आणि राज्यातील देशातील इतर ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे काँग्रेस आणि महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात असुरक्षित लाडकी बहिण, लाडक्या बहिणीला न्याय द्या बहिणीच्या लेकीला सुरक्षा द्या, ग्रहमंत्र्याचे लक्ष सत्तेवर कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, महायुती सरकारने राजीनामा द्यावा, पीडित महिलांना न्याय द्या, बलात्कारयांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, अश्या घोषणांचे फलक होते.
यावेळी निषेध व्यक्त करताना काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, माणुसकीला काळीमा फासणारी बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर अत्याचार घटना गुन्हा ज्या संस्थेत घडली ती संस्था भाजप RSS शी संबंधित असल्यामुळे त्यात सहभागी असलेल्या आरोपी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आला म्हणून जनतेचा असंतोषाचा उद्रेक होऊन रस्त्यावर उतरली रेल्वे बंद केले न्याय मागणाऱ्या जनतेवर महायुतीच्या मिंधे सरकारने पोलिसी बळाचा वापर करून अमानुष लाठीमार केला. न्याय मागणाऱ्यांवर लाठीमार करून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यभर जनतेचा राग अनावर झाला असून बदलापूर व इतर ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला होता यामुळे सरकार घाबरले उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक महिने एस टी चा संप घडवून आणून जनतेला त्रास देणाऱ्या अँड गुणरत्न सदावर्तेला हाताशी धरून कोर्टाच्या माध्यमातून महिला अत्याचार विरोधातील आंदोलन दाबण्याचा केला. पण महाविकास आघाडी महिला अत्याचााविरोधात आलेला जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आज निषेध आंदोलन केले आहे.
१५०० रूपयांपेक्षा महिलांचे अब्रू मौल्यवान आहेत हे या नाकर्त्या सरकारला कळत नाही. महाराष्ट्र बंदची नुसती घोषणा झाली तरी सरकारची दडपशाही सुरू झाली संविधानात्मक पध्दतीने दोन चिमुकल्या जिवांना न्याय मिळावा म्हणुन जनतेने आंदोलनही करू नये का ? बदलापूरमधील चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधासाठी, सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि उद्या तुमच्या आमच्या घरातील बहिणीला, लेकीला नराधमांची भीती न बाळगता मोकळेपणानं जगता यावं यासाठी आज आंदोलन करण्यात आले. सरकारने तेलंगणा मध्ये ज्या प्रमाणे बलात्कार प्रकरणातील आरोपींना गोळ्या घालून मारण्यात आले. किंवा तातडीने फास्ट ट्रॅक कोर्ट नेमून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.
या निषेध आंदोलनात काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, माजी आमदार दिलीपराव माने, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष अजय दासरी, गणेश वानकर, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, संजय हेमगड्डी, महादेव कोगनुरे, अशोक निंबर्गी, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, अलकाताई राठोड, सुशीला आबुटे, आरिफ शेख, फिरदौस पटेल, परविन इनामदार, अनुराधा काटकर, अस्मिता गायकवाड, किसन मेकाले, विनोद भोसले, U. N.बेरिया, मनोहर सपाटे, सुदीप चाकोते, गणेश डोंगरे, प्रमोद गायकवाड, अंबादास बाबा करगुळे, हणमंतू सायबोळू जुबेर कुरेशी, उमेश सुर्ते, भीमाशंकर टेकाळे, युवराज जाधव, उदयशंकर चाकोते, शौकत पठाण, तिरुपती परकीपंडला, लक्ष्मीकांत साका, केशव इंगळे, सुशील बंदपट्टे, NK क्षीरसागर, सुनीता रोटे, विष्णू कारमपुरी, प्रताप चव्हाण, दत्तात्रय वानकर, महेश धाराशिवकर, भारती इप्पलपल्ली हेमाताई चिंचोलकर,संघमित्रा चौधरी, संध्या काळे, करिमुनिसा बागवान, श्रध्दा हुल्लेनवरू, बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तिकोंडा, मकबूल मोहोळकर, अशोक कलशेट्टी, अनिल मस्के, प्रवीण वाले, मैनुद्दीन शेख, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, लखन गायकवाड, अशोक देवकते, अक्षय वाकसे, प्रशांत बाबर, संजय गायकवाड, परशुराम सतारेवाले, दिनेश म्हेत्रे, सागर उबाळे, श्रीकांत वाडेकर, भोजराज पवार, सुनील सारंगी, मधुकर आठवले, राजन कामत , नुरअहमद नालवार, नागेश म्याकल, सुशीलकुमार म्हेत्रे, गिरिधर थोरात, राहुल वर्धा, राधाकृष्ण पाटील, शिवशंकर अंजनाळकर, विवेक इंगळे, राहुल बोळकोटे,सूर्यकांत शेरखाने, जावेद शिकलगार, शिवाजी साळुंखे, इरफान शेख, दीनानाथ शेळके, एजाज बागवान, श्रीशैल रणधीरे, चंद्रकांत टीक्के, सुभाष वाघमारे, श्याम केंगार, राजेश झंपले, धीरज खंदारे, शोभा बोबे, रूकैय्या बिराजदार, वर्षा अतणुरे, सलीमा शेख, मुमताज मदर शेख, शुभांगी लिंगराज, सुनीता शेरखाने, शिल्पा चांदने, मल्लेश सूर्यवंशी, सलीम मनुरे, श्रीकांत दासरी चंद्रकला निजमलू, असलम शेख, शाहू सलगर, मनोहर चकोलेकर, नरेश महेश्वरम, सतिष संगा, अभिलाष अच्युगटला, चंदू नाईक, बसू कोळी, दीपक मठ, रूबेन डेव्हिड यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, कम्युनिस्ट पार्टीचे इतर पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.