Solapur Patra Talim Lezim Practice 2024 Video
सोलापूर प्रतिनिधी –
प्रत्येक सोलापूरकर बाहेरगावी गेला अन् गणपती मिरवणुकीची चर्चा निघाली, तर सोलापुरी लेझीमच्या मर्दानी पैतरेबाजीबद्दल नक्कीच छाती फुगवून सांगतो. लेझीम येथे मुख्य दोन प्रकारांत खेळले जाते. तालमीच्या पैतरेबाजीतही फरक आहेत अन् प्रत्येक तालमीचा आपल्या वेगळ्या डावावर अभिमान आहे.
गणेशोत्सव आला की महिना-पंधरा दिवस आधीच लेझीमचा सराव गल्लोगल्ली सुरू होतो, हे मात्र नक्की. रात्रीचे आठ वाजले की, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या दिमाखात गल्लीच्या कट्ट्यावर चौकात जमतात, एव्हाना तडमताशा व हलगी वाजवणारे तयारच असतात. हलगीचा कडकडाट चालू झाला की कार्यकर्त्यांच्या रांगा तयार होतात अन् सुरू होतात, एक ते दहा डावांचे पदलालित्य. सलामी, गिरकी, दंड, बैठका… सोलापूरकरांना लेझीमचं इतकं आकर्षण आहे की, हलगीचा आवाज घुमला की पाय चौकाकडे आपोआप वळतात.
असाच जल्लोष पत्रा तालीम मंडळाच्या लेझीम सरावात पाहायला मिळाला आहे.
VIDEO : – 👇👇👇