सोलापूर प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भाग म्हणून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना एका वाहनात ८५ किलो गांजाचा साठा पोलिसांना आढळून आला. या जप्त गांजाची किंमत सुमारे सहा लाख ८४ हजार रुपये एवढी आहे. गांजा घेऊन जाणाऱ्या मोटारीसह १५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोहोळजवळ ही कारवाई करण्यात आली.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने आंदोलन सोलापूर-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा...
Read more