पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
सोलापूर | बाळे परिसरातील अदीला नदीच्या परिसरात क्वचितप्रसंगी आढळणारा तिरंदाज पक्षी दिसला. या पक्षाची मान लांब असते. ताणलेल्या धनुष्यातून बाण सुटावा, त्या वेगाने हा पक्षी भक्ष्यावर हल्ला करतो. त्यामुळे या पक्ष्याला तिरंदाज म्हणतात. हा आकाराने मोठ्या बदका एवढा असतो. पानकावळ्या सारखा दिसणारा हा पाणपक्षी त्याच्या पाठीवर रुपेरी रंगाच्या रेषा असतात. त्याचे डोके व मानेचा रंग मखमली बदामी असतो. तसेच, हनुवटी व गळा पांढुरका आणि लांब तहाठ शेपटी असते. पोहोताना त्याची मान पाण्याबाहेर नागासारखी वळवताना दिसते त्यामुळे ‘सापमान’ असेही म्हटले जाते.डोके अरुंद आणि खंजीरा सारखी- चोच असते.नर आणि मादी दिसायला सारखेच असतात, अशी माहिती पक्षिमित्र संतोष धाकपाडे यांनी दिली.
या पक्ष्याचे तिरंदाज असे नाव का?
तिरंदाज हा पक्षी पाणथळे, दलदली, हळू वाहणाऱ्या नद्यावर आढळून येतो. पाण्यात पोहताना पूर्ण शरीर पाण्यात बसलेली असते. बदकासारखे पाय असल्यामुळे ते पाण्यात चपळ असतो आणि आरामात पोहू शकतात. सापसरखी लांब मान आणि टोकदार चोचीने हा पक्षी शिकार करतो. पाण्यात पूर्ण पणे बुडून, आपल्या चोचीचा वापर एखाद्या भल्यासारखे वापर करून माश्याच्या शरीरात चोच खुपस्तो. अश्या प्रकारे अचूकपणे मासा टिपणाऱ्या या पक्ष्याला ‘ तिरंदाज ‘ असे नाव दिले आहे. चोचीत मासा अडकल्यावर तो पाण्याच्या वरती येतो. मासा हवेत उडवून, अचूकपणे तोंडत झेलून गिळतो. सापासारखी लांब मान असल्यामुळे याला ‘ सर्प पक्षी ‘ असे ही नावं आहे.
तिरंदाज हा मोठ्या आकाराचा पक्षी असून त्याची लांबी ८५-१०० सेमी एवढी असते. पंख उघडल्यावर एका पंखाच्या टोकापासून ते दुसऱ्या पंखाच्या टोकापर्यंत ची लांबी ११५-१३० सेमी एवढी असते. ७-८ सेमी लांब टोकदार चोच असते आणि सापासखी लांब मान असल्यामुळे याला सर्प पक्षी म्हणतात. दक्षिण आशिया खंडात हा पक्षी आढळतो.हा पक्षी क्वचितच आढळत असल्याने पक्षी मित्रांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे.
– संतोष धाकपाडे, सचिव, वाईल्डलाइफ काँझर्वेशन असोसिएशन