महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय. महायुतीला महाराष्ट्रात 236 जागा मिळाल्या आहेत. 132 जागा मिळवून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पक्ष ठरलाय. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 तर शिंदेंच्या शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर भाष्य केलंय. मी अगदी मनमोकळेपणाने काम करणारा माणूस आहे. सर्व पदांपेक्षा लाडका भाऊ हे मोठं पद आहे. मी प्रधानमंत्री साहेबांना फोन केला. त्यांना म्हणालो, सरकारमध्ये निर्णय घेताना आमची कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली. तुम्ही घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. निर्णय घेताना वाटू देऊ नका की, एकनाथ शिंदेची अडचण आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
सोलापूर - सोलापुरात देखील २५ च्या आसपास पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य असून त्यात सिंधी हिंदू असल्याचे समजते. यात काही लाँग टाईम...
Read more