Solapur – Goa – Mumbai Plane Timming To Solapur
सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी
सोलापूर ते मुंबई ₹. १,४८८/- पासुन सुरु
सोलापूर ते गोवा ₹.६८९/- पासुन सुरु
सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-गोवा या थेट हवाई मार्गांचे फ्लाय ९१ कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले असून, हे दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारे आहेत. या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे. सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी फ्लाय ९१ कंपनीच्या अधिकाऱ्यांना ह्या संदर्भात इमेलद्वारे माहिती मागितली होती.
सोलापूर ते मुंबई :
सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त ₹1,488 पासून सुरू होतो. विविध स्लॅबमध्ये दर वाढत जातात, जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धतेनुसार ठरवले जातात. उच्चतम दर ₹9,584 पर्यंत आहे. अतिरिक्त शुल्कात ₹217 युजर डेव्हलपमेंट फी (UDF), ₹236 विमान सुरक्षा शुल्क (ASF), आणि 5% GST यांचा समावेश होतो.
सोलापूर ते गोवा (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ)
सोलापूर ते गोवा थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त ₹689 आहे. या मार्गावरही स्लॅबनुसार दर ₹8,785 पर्यंत जातात. अतिरिक्त शुल्कातही UDF, ASF, आणि GST चा समावेश आहे, जो मुंबई मार्गाप्रमाणेच आहे.
प्रवाशांसाठी स्वस्त व सोयीस्कर पर्याय :
सोलापूर विमानतळाच्या या सेवेमुळे प्रवाशांना जलद आणि किफायतशीर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. या मार्गावर महाराष्ट्र शासनाच्या व्हायबिलिटी गॅप फंडिंग आणि ‘रीजनल कनेक्टिव्हिटी योजना’ (RCS) अंतर्गत विमान सेवा देण्याचा प्रस्ताव केंद्रात असल्याने काही मार्गांवर फक्त GST लागू होतो, ज्यामुळे प्रवास अधिक परवडणारा ठरतो.
चौकट –
मुंबई ↔️ सोलापूर
मुंबई ते सोलापूर
निर्गमन वेळ: सकाळी 11:55
पोहोच वेळ: दुपारी 1:45
सोलापूर ते मुंबई
निर्गमन वेळ: सकाळी 9:40
पोहोच वेळ: सकाळी 11:20
गोवा ↔️ सोलापूर
गोवा ते सोलापूर
निर्गमन वेळ: सकाळी 8:00
पोहोच वेळ: सकाळी 9:10
सोलापूर ते गोवा
निर्गमन वेळ: दुपारी 2:15
पोहोच वेळ: दुपारी 3:30
कोट –
सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल असुन कंपनीच्या वतीने लवकरच बुकींग सुरू होणार असल्याचा इमेल प्राप्त झाले आहे. सोलापूर विमानतळाच्या या नव्या सेवांमुळे धार्मिक तथा स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि व्यवसायिक प्रवाशांसाठीही ही सेवा वरदान ठरणार असल्याचा आशावाद सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी व्यक्त केला.