Solapur – Pune Highway Accident News सोलापूर- पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावासमोरं कारची दुचाकीला जोरदार धडक तरुणाचा जागीच मृत्यू
दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावासमोर मुंबईवरून बेंगलोर येथे जाणाऱ्या एका भरधाव स्कोडा कार क्रमांक KA 09 MD 4898 ने रस्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकी क्रमांक MH 13 Z 7270 ला बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघात दुचाकी चालक डोक्याला, पायाला जबर मार लागून जागीच ठार झाला असुन सदर मृत्यू झालेल्या तरुणाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंध भोसले यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले
असुन या अपघातातील मृत तरुणाचे नाव श्री अशोक किसन गोरे वय ३२ वर्षे रा. तेलंगवाडी ता.मोहोळ जि.सोलापूर अशे असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथिल ग्रस्तीपथक श्री उमेश भोसले साहेब, ग्रस्तीपथक चालक श्री बंडू गायकवाड, आणि ग्रस्तीपथक सहायक श्री स्वप्नील शिंदे आणि मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री. मल्लिकार्जून सोनार साहेब (PSI) आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताची माहिती मोहोळ पोलिस स्टेशन चे अपघात विभागांचे अधिकारी यांना दिली अशी माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्थी पथकाचे प्रमुख उमेश भोसले यांनी दिली आहे.