सोलापूरकरांना भेटणार नवा अनुभव ; ध्वनीप्रदूषण व हवाप्रदूषण विरहित प्रवासाचा लाभ घ्यावा – गोंजारी
सोलापूर – प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने यापूर्वी राज्यातील बहुतेक विभागांमध्ये ई-बससेवा सुरु केली आहे. आता सोलापूर ते लातूर आणि सोलापूर ते सातारा या मार्गावर आजपासून ई-शिवाई बससेवा सुरु होणार आहे.
आजपासून सोलापूर-लातूर आणि सोलापूर सातारा ई-शिवाई बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सहा बसेसच्या माध्यमातून सोलापूर-लातूर- सोलापूर – सातारा मार्गावर ही ई- शिवाई बसची सेवा सुरू होणार असल्याने सोलापूरकरांचा प्रवास आरामदायी तसेच आनंदी होणार आहे.
सोलापूर ते लातूर आणि सोलापूर – सातारा या मार्गावर बस धावणार आहे. या बसेस सोलापूर- तुळजापूर-उजनी औसा-लातूर परत अशा नियमित धावतील. या बसेस सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होऊन रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असतील. प्रत्येक अर्ध्या तासाला सोलापूरहून लातूरपर्यंत बस सेवा उपलब्ध असेल. प्रवाशांना जलद, सुरक्षित व आरामदायी असा प्रवास असेल.
आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी वातानुकुलीत पर्यावरणपूरक ई – शिवाई इलेक्ट्रिक बस सोलापूर विभागात आज दाखल होणार आहे. तर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी व विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सकाळी १०.०० वाजता उद्घाटन करुन या बससेवेला प्रारंभ होणार आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने बसगाड्यांची संख्या वाढविली जाणार आहे. शिवाई ई- बसगाडीचा तिकीट दर हा (सोलापूर ते सातारा ५८० रुपये), (सोलापूर ते लातूर २७५ रुपये) इतका असणार आहे. महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सवलत देखील असणार आहे. दुसरीकडे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मात्र या सुसज्ज बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांनी या नवीन बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी केले आहे.
प्रवाशांसाठी आरमदायी शिवाई बस…
ई शिवाई बसमध्ये एकूण ४२ आसने आहेत. ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत ही गाडी प्रतितास ६० कि.मी. वेगाने धावणार आहे. या बसमध्ये ९० किलो व्हॅट च्या (KWS) एकूण चार बॅटरी क्षमता असून प्रवाशांकरिता मोबाइल चार्जिंग,व एलईडी बल्ब आहेत.
चौकट –
असे आहे नव्या इलेक्ट्रिक बसचे वेळापत्रक आणि दर –
सोलापूर ते लातूर सकाळी ६.०० पासून सायंकाळी ५.३० पर्यंत एकूण १२ फेऱ्या
लातूर ते सोलापूर सकाळी ९.०० पासून सायंकाळी ९.०० पर्यंत एकूण १२ फेऱ्या
सोलापूर ते सातारा सकाळी ११.३० पासून रात्री १० पर्यंत एकूण २ फेऱ्या
सातारा ते सोलापूर सकाळी ६.०० ते रात्री १० पर्यंत एकूण २ फेऱ्या
सोलापूर ते लातूर –
ई – शिवाई बसगाडीचा तिकीट दर – २७५ रू.
साध्या बसचा – १९५ रू.
सोलापूर ते सातारा
ई – शिवाई बसगाडीचा तिकीट दर – ५८० रू.
साध्या बसगाडीचा तिकीट दर – ३६५ रू.
कोट –
ध्वनीप्रदूषण व हवाप्रदूषण विरहित प्रवासाचा लाभ घ्यावा
सदरील बसेस ह्या वातानुकूलित असतील, आरामदायी सीट्स असतील, सदरील बसेस मध्ये महिलांना ५० टक्के सवलत असेल, अमृतजेष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत असेल, जेष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत असेल तसेच ईतर सर्व सवलती असतील. सदरील बसेस ह्या ध्वनीप्रदूषण व हवाप्रदूषण विरहित असतील. तरी सर्व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, अशी विनंती सोलापूर विभागामार्फत करण्यात येत आहे.
अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक सोलापूर एसटी विभाग
चौकट –
ई-शिवाई ची वैशिष्ट्ये
– बसेस या ध्वनी प्रदूषण व हवा प्रदूषण विरहित असतील.
– फुल चार्जिंगनंतर पार करणारे अंतर ३०० किलोमीटर. – बस पूर्ण वातानुकूलित.
– बसमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा.
– रेल्वेप्रमाणे पुस्तके वाचण्यासाठी सीटच्यावरील बाजूला लाईट