एकत्व फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ; रस्त्यावर झोपणाऱ्याच्या अंगावर टाकले ब्लॅंकेट

सोलापूर –
मागील काही दिवसापासून सोलापूर शहरातील हवामान सातत्याने बदल होत आहे. थंडीचा पाराही चांगलाच वाढला आहे. अशातच रस्त्यावर मोकळ्या अंगावर झोपणाऱ्यांना गरजवंतांना माणुसकीची ऊब मिळावी. या उद्देशाने एकत्व फाउंडेशन बाळे येथील युवकांनी शहरातील विविध चौकात फिरून रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्या भिक्षुकांच्या अंगावर प्रत्यक्ष पांघरून घालून एक आगळा वेगळा उपक्रम राबविला.
थंडीच्या दिवसात रस्त्यावर झोपणाऱ्यांना गरजूंना थंडीपासून संरक्षण मिळावे. या हेतूने रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत गरजूंच्या अंगावर. ब्लॅंकेट, चादर, टोपी, मफलर, इत्यादी प्रत्यक्ष पांघरून घालून सेवा करण्यात आले असल्याचे एकत्व सोशल फाउंडेशन बाळे चे प्रमुख दीपक करकी यांनी सांगितले.
या उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करून पुढे दत्त चौक, सिद्धेश्वर मंदिर परिसर, शनी मंदिर, रेल्वे स्टेशन, सात रस्ता या भागातील रस्त्यावरील झोपणाऱ्यांच्या अंगावर पांघरून घालण्यात आले..
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण सरवळे, ऋषिकेश हरसुरे, दीपक करकी, चेतन झाडे, शाहबाज मकानदार, पिरप्पा कोळी, इत्यादींनी परिश्रम घेतले.