आज आपण सर्वांना आवडणारी अशी खास रेसिपी बघणार आहे आणि ती म्हणजे खोबरा किस चे लाडू, खोबरा किसचे लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू झटपट तयार होतात व स्वादिष्ट, चविष्ट लागतात. तर झटपट तयार होणारे असे मऊसुद लाडूची रेसिपी बघूया –

घटक
काजू – १/४ कप
दूध पावडर – १/४ कप
तूप – १ चमचा
खोबरा कीस – ३ कप
वेलची पूड – १/४ चमचा
दूध – ११/४ कप
साखर – १ कप
कुकिंग सूचना
1)सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात काजू व दूध पावडर घेऊन बारीक पूड तयार करून घ्या. व बाजूला ठेवून द्या.
2)त्यानंतर एका पॅनमध्ये १ चमचा तूप घाला व ३ कप खोबऱ्याचा कीस घालून मंद आचेवर ८ ते १० मिनिटे परतत भाजून घ्या. नंतर खोबरा कीस चा हलकासा रंग बदलतो.
3)त्यानंतर त्यात ११/२ कप दूध घाला. म्हणजे जेवढा खोबरा कीस घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटी मध्ये दूध घाला व एकत्र करा.आणि हे मिश्रण मंद आचेवर १० ते १२ मिनिटे परतत रहा.
4)नंतर त्यात काजू व दुध पावडर ची तयार केलेली पूड घाला. त्याने लाडूला छान चव येते. व नंतर आणखी थोडावेळ मंद आचेवर परतत रहा.
5)आता हे मिश्रण चांगले भाजून झाल्यावर त्यात १ कप साखर घाला व मंद आचेवर छान परतत राहा.
6)थोडा वेळाने साखर वितळायला लागेल व हे मिश्रण ओलसर होईल. मिश्रण सतत परतत राहायचे थोड्यावेळाने त्याचा गोळा तयार होईल. गोळा तयार होईपर्यंत सतत परतत राहायचं व छान भाजून घ्यायचं.
7)आता थोडा वेळ हे मिश्रण थोड थंड होऊ द्या. व हलकं गरम असतानाच त्याचे लाडू बांधून घ्यायचे.
8)लाडू बांधताना एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये खोबरा कीस घ्या. व लाडू बांधून झाला की त्याला त्या खोबरा कीस मध्ये घुळवून घ्या म्हणजे तो दिसायला खूप छान दिसतो.
9) अशाप्रकारे सर्व लाडू बांधून घ्यायचे. हे लाडू साधारण दोन दिवस बाहेर टिकतात व फ्रिजमध्ये ठेवल्यास पंधरा दिवस टिकतात तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा व कशी झाली ते आम्हाला कळवा.
10 टीप –
1. साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो. लाडू गोड हवे असल्यास त्यात अर्धी वाटी साखर जास्त घाला.
2. आपण लाडू मध्ये काजू बदाम चे काप करून सुद्धा घालू शकतो