Womens Day Special | पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मोटरसायकल दुरुस्ती व्यवसायात वृषाली भुरले यांची भरारी….
Solapur – गॅरेज कामासाठी कामगारांची कमतरता त्यामुळे पतीवर पडणारा ताण आणि सासऱ्यांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे वृषाली भुरले या मोटारसायकल दुरुस्तीच्या कामाकडे वळल्या आहेत. मोटरसायकल दुरुस्ती व्यवसाय म्हटलं की पुरुषांची मक्तेदारी आलीच मात्र आता सोलापुरात वृषाली भुरले यांच्या रूपाने महिला मेकॅनिक बघायला मिळत आहेत.
मागील आठ वर्षापासून ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करणाऱ्या वृषाली या आपले पती महादेव भुरले यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. घर प्रपंच सांभाळून दिवसाकाठी पाच सहा मोटारसायकल दुरुस्त करुन त्या दिवसाला जवळपास तीन हजार रुपये कमवतात.