Man Marathi News Network,
सोलापूर प्रतिनिधी –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्र.५ च्या वतीने आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मोफत नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले.
या योजने अंतर्गत प्रभागातील महिला माता – भगिनींना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य मिळणार असून या योजनेचा लाभ मिळावा म्हणुन राष्ट्रवादी कट्टा येथे आज अर्ज जमा करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनींनी उपस्थित होत्या यावेळी काही महिलांना ताबडतोब ऑनलाइन पोच पावती देण्यात आली.या कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी सुभाष मामा डांगे, किशोर काका पाटील,बिज्जु प्रधाने, मंदाकिनी तोडकरी,कल्पना क्षीरसागर,सुनीलभाऊ भोसले मारुती अण्णा तोडकरी, मदन क्षीरसागर,नाना गाडेकर, शिवाजी कोयाळकर,बापू पाटील, शरद मुत्तुर,बाबु तोडकरी,मोहन ढेपे,श्रीमंत चव्हाण,मंजुषा डोईफोडे, सुरेश तोडकरी, गंगाराम कल्याणकर, निशांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर योजनेचे फॉर्म आपल्या येथे स्वीकारले जात असून सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.