man marathi news network,
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojna |
प्रतिनिधी –
लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता महिल्यांच्या खात्यात जमा झाला आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत महिलांना या योजनेचा फाॅर्म भरता येणार आहे. विधानसभा निवडणुकी या योजनेच्या जोरावर जिंकण्याचा दावा महायुतीतील नेते करत आहेत. मात्र, ही योजना बंद करण्याची भीतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीचा विरोध आहे. काँग्रेसवाले याच्या विरोधात कोर्टात केले होते. जर, दुर्देवाने महाविकास आघाडीचे सरकार आले तर ते ही योजना बंद करतील, अशी भीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे