CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojna –
प्रतिनिधी – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कशी फसवी आहे, असे सांगत सावत्र भावांनी योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही तिघे त्यांना पुरून उरलो. आता तुम्हाला संधी मिळेल, तेव्हा या सावत्र भावांना त्यांची जागा दाखवा. महायुती सरकारला तुम्ही साथ दिली, आमची ताकद वाढवली, तर या योजनेची रक्कमही वाढत राहील.’ असे थेट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना दिले.