man marathi news network,
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojna Document –
माझी लाडकी बहीण योजनेत बदल ; रेशन कार्ड नाही तरीही चालेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
सोलापूर : राज्य सरकारची अतिशय महत्त्वाची असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. (Ladki Bahin Yojna) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बदल करण्यात येत आहेत एकही लाभार्थी योजनेतून राहू देणार नाही अशा भूमिकेत सरकार असून आता रेशन कार्ड नसेल तर त्यांना केवळ स्वघोषणापत्र (Self Certification) द्यावे लागणार आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.