Bigg Boss Marathi Season 5
प्रतिनिधी – बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसतो आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आम्ही वैभव चव्हाणला पाठवला आहे. तुम्ही गद्दार म्हणून बाहेर पडू नका, असं म्हणत भाऊच्या धक्क्यावर रितेशने वैभव चव्हाणची हजेरी घेतली.
रितेश देशमुखने वैभवला सुनावलं
तुम्ही मला तुमच्या टीमचा सदस्य समजू नका, असं वैभव तू म्हणायला हवं होतंस. पण खरं बोलायला जिगर लागते. ही जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात मिळत नाही. ही जिगर तुमच्यात दिसत नाही. इथून पुढे तुमच्यावर कोणी विश्वास का ठेवायचा. तुमच्या आत आहे तेच बाहेर दिसणार आहे. प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झालाय..मला बघायचंय ही मैत्री कधीपर्यंत टिकते. आम्ही आतमध्ये वैभव पाठवलंय गद्दार म्हणून बाहेर पडू नका, असं म्हणत रितेश वैभव चव्हाणला सुनावतो.