Bigg Boss Marathi New Season Day 27 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन दणक्यात सुरू झाला असून आता सदस्यांचे वाढदिवसदेखील यायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज निक्कीचा जल्लोषात वाढदिवस साजरा होणार आहे. आजच्या भागात निक्कीच्या वाढदिवसानिमित्त डीपी दादांनी खास गाऱ्हाणं घातलेलं पाहायला मिळणार आहे.
निक्कीला शुभेच्छा देत डीपी दादा म्हणत आहेत,”वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. 75 वर्षे जग.. तुझं असचं तारुण्य टिकूदेत. लोकांना छळू नकोस. त्यांना त्रास देऊ नकोस. लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक. पण कोणाला काही मानसिक त्रास देऊ नकोस. तुला वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा…शुभेच्छूक साधासुधा एक पलिकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस”.
आजच्या भागात निक्की डीपी दादांना सांगते,”मला वीट आलाय. माझा सर्वोत्कृष्ट वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी ‘बिग बॉस’ला धन्यवाद म्हणते. माझे डोळे उघडलेत. टॉपला जायचं तर एकत्र जाऊयात. मी एखाद्याला निवडलं ना तर त्याच्यासाठी मी सर्वांसोबत लढू शकते. पण समोरच्याला या गोष्टी कळल्या पाहिजेत. अभिजीत मला समजून घेतो”. एकंदरीतच निक्कीला अभिजीतचा प्रचंड राग आलेला आहे. याबद्दल घरातील इतर सदस्यांकडे ती व्यक्त होताना दिसून येते.