रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त १,११,१६७ वृक्ष लावणार ५,००,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
सोलापूर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी राज्य मंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा व शहर पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात ५,००,००वृक्ष लागवडीचा संकल्प केला आणि याचा प्रारंभ नांदणी वनपरिक्षेत्र दक्षिण सोलापूर येथे ५५६७ वृक्ष लागवड करून करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आली,या नंतर सर्व कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा कार्यक्रम स्थळी मार्गक्रम झाला याच वेळी जागो जागी मा.राजाभाऊ सरवदे यांचे कार्यकर्ते तसेच लोकांनी जंगी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
नांदणी येथील वृक्ष लागवड उपक्रमात सृष्टी इको व्हिजन चे संचालक प्रवीण तळे सर यांच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा,हरित वसुंधरा फाऊंडेशन,जयोस्तुते फाऊंडेशन,एकोनेचर क्लब अश्या अनेक NGO सामजिक संघटना,पर्यावरण प्रेमी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.राजाभाऊ सरवदे साहेब,सोलापूरचे प्रसिद्ध वकील व पर्यावरण प्रेमी मा.महिंद्रकर सर,नांदणी वन परिक्षेत्राचे अधिकारी मा.भालेराव सर,मा.शिवानंद बंडे सरपंच नांदणी,भारतराव खरात सदस्य नांदणी ग्रामपंचायत,चंद्रकांत वाघमारे,राजेश उबाळे,रवी गायकवाड,विक्रम शेळके,मिलिंद सरतापे,खंडू सातपुते,किरण धाईंजे,अविनाश मडीखांबे,अमोल कदम,मारुती वाघमारे, तात्या काळे ,विठ्ठल क्षीरसागर,दत्ता क्षीरसागर,रामजी गायकवाड,विठ्ठल वाघमारे,बाबासाहेब माने आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक करते प्रसंगी शहराचे माजी अध्यक्ष अतुल नागटिळक यांनी उपक्रमाची माहिती दिली आणि युनायटेड नेशन्सच्या माहिती प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात १ कोटी ४८,००,००० वृक्षलागवड आवश्यक असल्याचे सांगितले तसेच शहर दुर्गंधी मुक्त करण्यासाठी शहरातील मोठ मोठ्या नाल्याच्या बाजूने पक्षाच्या वतीने सुगंधी फुलांची व बाबुंची झाडे लावणार असल्याचे सांगितले तसेच एका वर्षाच्या आत ५,००,०००वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करून त्याचे संगोपन करू असा आशावाद व्यक्त केला.
त्याच बरोबर मा.महिंद्रकर सर यांनी या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले त्यांनी राजाभाऊ सरवदे यांना शुभेच्छा देत असताना वाढदिवस असाच शतकोत्तर या ठिकाणी होत रहावा आणि याच प्रमाणे वृक्ष लागवड होत राहो आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले.
रिपाईचे नेते राजेश उबाळे यांनी सांगितले की असा उपक्रम पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पार्टीच्या वतीने घेण्यात आला आणि याच भाग्य आमच्या पार्टीला मिळाले.
प्रसंगी मा.राजाभाऊ सरवदे यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.प्रत्येक शहरात वृक्ष तोड मोठ्या प्रमाणत होत आहे आणि त्यामुळे ऊनाची तीव्रता प्रखरतेने जाणवत आहे पुढील काळात आपणाला ऑक्सीजन विकत घेण्याची वेळ येईल म्हणून प्रत्येकाने वेळीच जागे होवून वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करून पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून थांबवावा.
तसेच राज्याचा अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याशी चर्चा करून राज्यातच नव्हे तर देशात वृक्ष लागवड उपक्रम पक्ष राबवेल असे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.पवन थोरात,सुशील सरवदे,शामसुंदर गायकवाड,शाम धुरी,अमोल दादा वामने,शिवराज पूल्लुर,शिवम सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमा साठी सोलापूर उपवन सरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील सर,प्रवीण तळे सर,शैलेश स्वामी सर,परशुराम लांबतुरे सर,अमित भडकुंबे सर,प्रतीक चंदनशिवे सर,डॉ.मनोज देवकर सर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.
सदर कार्यक्रमासाठी शहर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.