प्रतिनिधी,
तालुक्यातील वागदरी येथे शुक्रवारी (दि. २० सप्टेंबर) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास वागदरी ते अक्कलकोट जाणारे रोडवर वागदरी शिवारात दोन महिन्यांपूर्वी मोबाइलवर झालेल्या मागील वादाचा राग मनात धरून चार आरोपीनी कोणत्या तरी लोखंडी धारदार हत्याराने १८ वर्षीय तरुणाच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अटक करण्यात आलेल्या आरोपींत अहमद शब्बीर शेख (वय १९), प्रकाश सिद्धता सोनकांबळे (वय २० दोघे रा. पुणे), व प्रेमरतन उर्फ बापु लक्ष्मण मुंदीनकेरी (रा. वागदरी, ता. अक्कलकोट) असे तिघांचे नाव आहे. तर आरोपी जावेद शेख हा अद्याप गायब आहे. याबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, २० सप्टेंबर रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास वागदरी ते अक्कलकोट जाणारे मुख्य रोडवर सिध्दगंगा ढाब्यापासून काही अंतरावर दोन महिन्यापूर्वी फिर्यादीचा अहमद यांच्यासोबत झालेल्या मोबाइलवर झालेल्या वादाचा राग मनात धरून अहमद शेख, जावेद शेख, प्रकाश सोनकांबळे व प्रेमरतन उर्फ बापू मुंदीनकेरी यांनी संगनमत करून अहमद शेख याने पायाने फिर्यादीचे पोटात मारल्यावर फिर्यादी जमिनीवर पडला. तेव्हा प्रेमरतन मुंदीनकेरी याने फिर्यादीस लाथाने मारहाण कैली. प्रकाश सोनकांबळे याने ‘माझे मित्राशी वाद घालता काय?’ असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत फिर्यादीचे शर्टाची गच्ची धरून उठल्यावर जावेद शेख याने हातात दगड घेऊन त्या दगडाने फिर्यादीचे डावे मानेवर, छातीवर डावे बाजूस व डावे खांदावर जबर मारले. अहमद शेख याने । ‘तू आता यापुढे माझेशी पुन्हा वाद घालणार नाहीस, तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून फिर्यादीला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने कोणत्यातरी लोखंडी धारदार हत्याराने फिर्यादीचे डोकीत मारहाण करून गंभीर जखमी केले म्हणून चौघाविरुध्द तक्रार दाखल झाला आहे. फिर्याद गोविंद साईनाथ वडतिले वागदरी ता. अक्कलकोट यांनी दिली. गुन्ह्याचा अधिक तपास पोसई आमितकुमार करपे हे करीत आहेत.