मराठा समाजाचा OBC मध्ये समोवश करावा तसेच सगेसोयरे सह कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे.
सोलापूर प्रतिनिधी,
सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने दिनांक २६ तारखेला वार गुरुवार रोजी सकल मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समोवश करावा तसेच सगेसोयरे सह कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे या मागणीसाठी सोलापूर सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील हे गेल्या 8 दिवसापासून उपोषनाला बसले आहेत. परंतु शासनाने त्यांची दखल घेतली नाही तसेच शासनाकडून विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून मराठा व ओ.बी.सी. यांच्यात भांडणे लावून जातीय दंगली घडविण्याचे कारस्थान सत्ताधारी करत आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरु करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाचे वतीने सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसापासून जरांगे पाटील यांचे उपोषण चालू आहे. परंतु, सत्ताधारी लाडकी बहीन योजनेचे मेळावे घेण्यात मग्न आहे. एकीकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठ्यांना फक्त आवश्वासने अवलंबले आहे. मराठा समाज मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहे. परंतु शासनाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन हा लढा संपवायला हवा होता. परंतु शासन मराठ्यांनी न मागीतलेले 10% आरक्षण देऊन समाजाची बोळवणे करत आहे ते मराठा समाजाला मुळीच मान्य नाही. त्यामुळे सरसकट मराठ्यांचा जोपर्यंत कुणबी मध्ये समावेश होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. या पत्रकार परिषदेला समन्वयक माऊली पवार, राजन जाधव, विनोद भोसले, झानेश्वर सपाटे, प्रकाश ननवरे, विलास लेकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
______________________
चौकट –
सत्ताधारी मराठा आणि OBC यांच्यात भांडणे व्हावीत म्हणून हाके आणि इतर लोकंना अंतरावली सराटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उपोषनाला परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठा व OBC यांच्या मध्ये विनाकारण वाद होत आहे. असा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारवर करण्यात आला आहे.
चौकट – अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. शाळा, कॉलेज सह सर्व शासकीय आणि खाजगी आस्थापनाही बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.