जर्मनीतून मागविले मशीनचे स्पेअर पार्ट ; ५० लाख दुरुस्तीचा खर्च
सोलापूर – मागील ०४ महिन्यापासून रुग्णालयातील MRI मशिन बंद होती. परंतू डॉ. संजीव ठाकूर यांच्या प्रयत्नाने MRI मशीन पुन्हा कार्यान्वीत झाली आहे. यामुळे गोर – गरीब रुग्णांना ही याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. ही MRI मशीनचे स्पेअर पार्ट जर्मनी देशातून मागविले आहेत. यासाठी तब्बल ५० लाख दुरुस्तीचा खर्च झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालय येथील एमआरआय मशीन मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती डॉ. वैशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठता डॉ.संजीव ठाकूर यांनी दिली.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोलापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातून रुग्णू उपचारासाठी येत असतात .याचबरोबर शेजारच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक ,तेलंगणा आधी राज्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांनची एमआरआय तपासणी करणे आवश्यक असते. परंतु मागील चार महिन्यापासून रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद होती. या मशीनची काही पार्ट कंपनीकडेही उपलब्ध होत नसल्यामुळे ही मशीन सुरू करण्यात दिरंगाई होत होती. मात्र नवीन मशीन उपलब्ध होईपर्यंत रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्वी कार्यालयात असलेली एम आर आय मशीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व एस एम जाधव प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रयत्नातून जर्मनी देशांमधून मशीनचे पार्ट मागून सदर एमआरआय मशीन दुरुस्त करून घेण्यात आलेली आहे. या मशीनच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांचा खर्च आला आहे .त्यामुळे ही मशीन रुग्णांच्या सेवेसाठी मंगळवारपासून दाखल आहे.
सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून महिन्याला ३५० ते ४०० रुग्णांचे एमआरआय केले जातात. सदर मशीन सुरू करण्यात आल्यामुळे गोरगरीब रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले.
चौकट – गेल्या चार महिन्यांपासून बंद असणारी MRI मशीन अखेर चालू होणार असून गोर – गरिबांना ह्याचा लाभ घेता येणार आहे. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व एस.एम. जाधव प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रयत्नातून जर्मनी देशामधून मशिनचे पार्ट मागविले आहेत.