Solapur News –
शेतकरी बांधवानी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, पारंपारीक शेतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सोलापूर शहर उत्तरचे मा. आमदार श्री. विजयकुमारजी देशमुख यांनी केले ते शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूर संचलित कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर येथे आयोजित कृषक सुवर्ण समृध्दी सप्ताहाचे उद्घाटन समारंभात बोलत होते. देशातील कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेला 50 वर्षे पुर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे व त्या निमीत्ताने कृषक सुवर्ण समृध्दी सप्ताहाचे आयोजन दि. 23 ते 28 नोव्हेंबर, 2024 करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सुवर्ण समृध्दी रथाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शबरी कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. प्रदिपजी गायकवाड उपस्थित होते.
तर कृषि विभागाचे उप-संचालक श्री. राजकुमार मोरे, कृषि विज्ञान केंद्र, सोलापूरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. ला. रा. तांबडे, आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक सौ. शितल चव्हाण, उत्तर सोलापूरचे तालुका कृषि अधिकारी सौ. मनिषा मिसाळ, राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र, सोलापूरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ (सुत्रकृमीशास्त्र) श्री. सोमनाथ पोखरे, गो आधारीत सेंद्रिय शेती करणारे श्री. संदिप ओक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूरचे अध्यक्ष मा. श्री. प्रदिपजी गायकवाड यांनी शेतक-याच्या सेवेत कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर अविरत कार्यरत आहे. शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा विशेषत: तरूण शेतकरी बांधवानी पुढे येणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रास्ताविकात बोलताना कृषि विज्ञान केंद्र, सोलापूरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. ला. रा. तांबडे यांनी कृषक सुवर्ण समृध्दी सप्ताह आयोजनागामील संकल्पना सर्वांना स्पष्ट केली. तसेच आतापर्यंत कृषि विज्ञान केंद्राने केलेल्या उत्कृष्ठ कार्याची माहिती सर्वांना दिली. दि. 23 ते 28 सप्टेंबर, 2024 या कालावधीत कार्यक्षेत्रातील विविध गावातुन सुवर्ण समृध्दी रथ फीरणार असुन त्याव्दारे विविध कार्यक्रमाव्दारे उपयोगी अधुनिक कृषि व पुरक तंत्रज्ञान शेतकरी बांधवाना सांगण्यात येणार आहे. यामध्ये प्रात्यक्षिके, मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्रे, पध्दत प्रात्यक्षिके इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृषि तांत्रिक सत्रामध्ये बोलताना हत्तुर येथील शेतकरी श्री. संदिप ओक यांनी गो-आधारीत शेतीमधील आपले अनुभव सांगितले. यावेळी डॉ. सोमनाथ पोखरे यांनी डाळींबातील सुत्रकृमी समस्येबाबत माहिती दिली. आत्मा, सोलापूरच्या प्रकल्प संचालिका सौ. शितल चव्हाण यांनी विविध योजनां विषयी माहिती दिली. तर श्री. राजकुमार मोरे, उप-संचालक यांनी गट संघटनाला महत्व द्यावे असे प्रतिपादन केले.