मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास कल्याणमंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मंत्री आणि महायुतीचे दिग्गज नेते यांची उपस्थिती असणार आहे. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील सुमारे ४० हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती असणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने महिलांच्या प्रवासासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसची सोय करण्याचा आली आहे.
एसटी बसेसच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील तसेच विविध तालुक्यातून महिला शहरात दाखल होत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एसटी बसेस थांबवून महिलांना होम मैदानाकडे पाठवण्यात आले आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दिसून येत आहे.