Jammu Kashmir – Hariyana Election Result
जम्मू -काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका निर्विघ्न पार पडल्या. येथील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. तर हरियाणामध्येही 5 ऑक्टोबरला मतदान प्रक्रीया पार पडली. आता जम्मू – काश्मीर आणि हरियानात कुणाची सत्ता येणार याचीही उत्सुकता सर्वांना लागली असून आज या दोन्ही राज्यांचे निकाल हाती येणार आहेत. याचेच आपण आता अपडेट घेत आहोत.
जम्मू-काश्मीरमधील 90 जागांवर तीन टप्प्यात मतदान प्रकिया पार पडली. निवडणुकीचा निकाल आता हाती येत आहेत. गेल्या वेळी 2014 मध्ये 87 जागांवर निवडणूक झाली होती, मात्र यावेळी मतदारसंघाची पुनर्चरना झाली त्यानंतर तीन नवीन मतदारसंघ वाढले आहेत. आता या निवडणुकी नॅशनल काँन्फरन्स आणि काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपही यावेळी सर्वच पक्षांना धक्कातंत्र देण्याच्या तयारीत आहे.
हरियाणा विधानसभा निवडणूक निकालाच्या कलानुसार भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरु असून हरियाणात भाजप एकतर्फी विजय मिळवणार, असे चित्र दिसत आहे.
दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 48 जागांवर आघाडीवर आहे. भाजपाला 30 जागांची आघाडी मिळाली आहे. पीडीपी 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत.