भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना आज पुन्हा एका धमकीचे पत्र मिळाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन दिवसांपूर्वीच याच व्यक्तींने पत्राद्वारे नवनीत राणा यांना धमकी दिली होती.
तीन दिवसांपूर्वी भाजपच्या खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र मिळाले होते, या प्रकरणाच्या तपासासाठी अमरावती पोलीस हैदराबादमध्ये दाखल झालेले असताना सोमवारी पुन्हा एकदा धमकीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. धमकीचे हे पत्र देखील हैदराबाद येथून पाठविण्यात आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस पथक नवनीत राणा यांच्या येथील शंकरनगर परिसरातील निवासस्थानी पोहचले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे.