
पुणे येथील चाकण मध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्र व लघु शस्त्र उत्पादन केंद्र याचे सुविधा केंद्र उद्धाटन समारंभ आणि वर्धापन दिन सोहळा मंत्रिमंडळातील सहकाऱ्यासह पार पडला. सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व अजित पवार यांनी केंद्रात निर्मित केलेले शस्त्रांची पाहणी करत असताना तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना एके 47 हे जगभरात गाजलेले रायफल सदृश्य मशीन गन शस्त्र दाखवत होते . हे शस्त्र पाहता पाहता अचानक उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनामिश्किलपणा करायची लहर आली त्यांनी त्यांच्या हातातील AK 47 हे शस्त्र बघता बघता उपस्थित पत्रकारांच्या कडे रोखून धरले आणि मिश्किलपणा करत त्यांना म्हटले की महायुतीच्या बातम्या द्या अन्यथा तुम्हाला उडवून टाकू !! आणि एकटाच उडवून टाकू असे म्हटले नाही तर मी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्ही दोघेही मिळून तुम्हाला उडवू अशी टिप्पणी केली. हे ऐकल्यावर सर्व पत्रकारांमध्ये प्रचंड हशा पिकला !!
बऱ्याच वेळा अजित दादा आपल्या परखडपणामुळे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर प्रत्येक कार्यक्रमाचा ते मनस्वी आनंद घेतात. आपल्या वक्तव्यामुळे कोण काय बोलेल किंवा कोण काय विचार करेल याबद्दल ते जरा सुद्धा चिंता करत नाहीत !! पत्रकार देखील अजित दादांच्या ह्या स्वभावाला जाणून आहेत त्यामुळे त्यांचा आणि पत्रकारांचा एक वेगळाच नातेसंबंध निर्माण झालेला आहे. अजितदादा देखील या नातेसंबंधाला सांभाळण्याचा सतत प्रयत्न करत असतात. या कार्यक्रमातील शस्त्रांच्या ऐवजी अजित दादांच्या या कृत्याची जास्त चर्चा होती !!