मला देखील तीन वेळा जीवे ठार मारण्याची धमकी- फारूक शाब्दी
सोलापूर – एमआयएम नेते व सोलापूर शहर मध्यचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी माध्यमांना माहिती देताना,राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.राज्यातील जनतेची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.मला देखील जीवे ठार मारण्याची धमकीचे पत्र मिळाले आहे.याबाबत मी पोलिसांना अजूनही तक्रार केली नाही.परंतु सलमान खान ,बाबा सिद्दिकी सारखे कडक बंदोबस्त असलेले निशाण्यावर आहेत,त्यामुळे मला देखील भीती वाटत आहे.मला देखील परिवार आहे.अशी प्रतिक्रिया फारूक शाब्दी यांनी दिली आहे.परंतु अशा धमक्याना मी घाबरत नाही,उमेदवारी मागे घेण्यावरून मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे असेही पुढे बोलताना फारूक शाब्दीनी प्रतिक्रिया दिली.