बाबा सिद्दिकीच्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार गृहखातेच;फारूक शाब्दी
महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या बंधनात आहेत,त्यांना फक्त आदेश द्यावा;एमआयएमच्या शहर अध्यक्षकांचे आवाहन
बाबा सिद्धीकींना एमआयएमकडून श्रद्धांजली अर्पण
सोलापूर:राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकिंना सोलापुरात एमआयएमच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बाबा सिद्धीकीं यांच्या हत्येला सर्वस्वी जबाबदारी म्हणजे गृहखातेच आहे.सिद्दिकीच्या हत्ये नंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे.एमआयएम सोलापूर शहर आणि जिल्हा अध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या अध्यक्षतेखाली बाबा सिद्धीकीं यांना सोमवारी सायंकाळी शहरातील विजापूर वेस येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.आय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असलेल्या याएका माजी मंत्र्याला असे ठार केले जाते,तर सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्यात आहे असे मत एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र पोलीस यांचे हात बांधलेले आहेत,अन्यथा गुंडाचा कधीच बंदोबस्त झाला असता.महाराष्ट्र पोलीसांचे हाथ कायद्याने बांधलेले आहे,पोलिसांना फक्त थोडा वेळ मोकळे सोडा,आणि गुंडाचा आपोआप बंदोबस्त होईल.असे खुले आवाहन एमआयएम नेते व सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार फारूक शाब्दी यांनी केले आहे.