Eknath Shinde On Ladki Bahin Yojna Update राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे म्हणाले, “ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता २१०० रुपये होतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojna) सुपरहिट झाली आहे. बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती झाली आहे”.
महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तीन महिन्यांतच सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबरअखेरचा लाभ विधानसभेच्या (Vidhansabha) आचारसंहितेपूर्वीच दिला.
निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देण्याची ग्वाही दिली. याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला. याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर २१ एप्रिलपासून (२१ April) होण्याची शक्यता आहे.