उमेदवारीवरुन आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याने काँग्रेसला बसला फटका : पाठिंब्याची जादू चालली नाही
सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. अक्कलकोट, पंढरपूर व सोलापूर शहर मध्य या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने सोलापूर जिल्हा हा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त जिल्हा ठरला गेला आहे.
विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात महायुती विरुध्द महाविकास
दिला. मात्र ऐनवळी दिलेल्या त्यांच्या पाठिंब्याची जादू चालली नाही.सोलापूर शहर मध्य विधानसभा
लोकसभेला काँग्रेस अन् विधानसभेत भाजपला लीड
सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरिता काही महिन्यापूर्वीच घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा दणदणीत विजय झाला. दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर मध्य, मंगळवेढा-पंढरपूर, मोहोळ या विधानसभा मतदारसंघात खा. प्रणिती शिंदे यांना मतांचा चांगलाच लीड मिळाला. मात्र विधानसभा निवडणुकीत केवळ मोहोळ विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनाच मतदारांनी पसंती दिली. त्यामुळे लोकसभेला काँग्रेस लीड अन् विधानसभेत भाजपला लीड असे चित्र दिसून आले आहे.
आघाडीच्या उमेदवारांत लढत झाली. मात्र महाविकास आघाडीत उमेदवारीवरुनच आघाडीत बिघाडी निर्माण झाली. शेवटी याचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सुरुवातीलाच काँग्रेसला जागा सुटण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी उध्दव ठाकरे शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांनाही उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांना एबी फॉर्म दिला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खा. प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना मतदानाच्या दिवशी पाठिंबा
मतदारसंघात खा. प्रणिती शिंदे यांचा राजकीय वारसदार म्हणून काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांनी निवडणूक लढविली. मात्र त्यांचा या मतदारसंघात दारुण पराभव झाला. मागील तीन टर्ममध्ये तत्कालीन आ. प्रणिती शिंदे यांच्यापेक्षाही अधिक मते घेत भाजपचे देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहर मध्यचा गड काँग्रेसच्या ताब्यातून अलगदपणे काढून घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता काँग्रेसचे अस्तित्व नामशेष झाल्याचे दिसून आले.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचाही सलग दुसऱ्या वेळी भाजपचे उमेदवार आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी
पराभव केला. या मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षाही अधिक मतांचा लीड घेत भाजपने यश संपादन केले. त्यामुळे या मतदारसंघातही भाजपच्या वर्चस्वापुढे काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे दिसून आले.
पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघातही सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली. या मतदारसंघात काँग्रेस व खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला. यात काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला. त्यामुळे या मतदारसंघातही काँग्रेसला अपयश आले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खा. प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा व पंढरपूर विधानसभा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्या. मात्र त्यांच्या सभेचीही जादू या दोन्ही मतदारसंघात चालली नाही. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना ऐनवेळी पाठिंबा दिल्यानंतरही या मतदारसंघात कोणतीच जादू झाली नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा हा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त जिल्हाच ठरला गेला आहे.