बाळे परिसरात मांगोबा मंदिराची स्थापना : मांगोबांना खंडेरायाचे शिष्य मानले जाते
सोलापूर – श्री खडेरायांना महादेवाचे रुप मानले जाते, तर केतू ग्रह शिवपार्वतीचा अंश असल्याने मांगोबा यांना खंडेरायाचे शिष्य मानले जाते. केतू ग्रहाने महादेवाने मागितलेल्या वरदानाने खंडोबा आणि मांगोबा म्हणजेच गुरु आणि शिष्य भेट झाल्याची आख्यायिका सांगितली जाते.
सत्ययुगात समुद्र मंथनामध्ये राहूचे दोन तुकडे झालेल्यापैकी एक तुकडा येथील वाडी वस्तीला पडले. आणि श्री गणेशाने हे दोन्ही तुकडे एकजागी येऊ नये म्हणून एक तुकडा आज बाळे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात केतू ग्रह या नावाने आहे. केतू ग्रह हे स्थान महत्त्वाचे आहे. कारण त्याने राहू – केतुंचे दोष कमी होतात. राहू केतू हे शिवपार्वतीचे अंश आहेत. अशी माहिती मंदिर पुजाऱ्यानी दिली आहे.
अशी आख्यायिका आहे की, केतुनी महादेवाजवळ इच्छा व्यक्त केली होती की तुम्ही बाळ अवतार घ्यावे. तेव्हा महादेवांनी सांगितले की, कलयुगामध्ये वाडी वस्ती मध्ये माझा भक्त असेल, तो महादेव अवतारातील खंडोबा देवतेचा एक भक्त सोलापूर (सोन्न्नलगी) असेल त्याच्या भक्तीसाठी व तू मागितलेल्या वरदानाची पुर्तता करण्यासाठी तू वाडी वस्ती मध्ये असशील त्या ठिकाणी तेथील भक्तांसाठी त्या ठिकाणी असणाऱ्या भक्तांच्या माध्यमातून बाळरुपी त्या गावी येईन.
सतत मांगोबा (केतू ग्रहाच्या ) कानावर शिवअवतारीत खंडोबाचे बाळे हे ऐकू येईल. म्हणून या गावाचे नाव बाळे पडले. व तेथील आसणाऱ्या माझ्या भक्तांची सेवा, रक्षण करण्याची शक्ती तुझ्यात राहिल. खंडोबा आणि मांगोबा यांना गुरु शिष्याची भेट आहे असे देखील म्हंटले जाते. खंडोबा शिव अवतारातील गुरु तर मांगोबा (केतू ग्रह) शिष्य असल्याचं मंदिराचे पुजारी अमोल पाटील यांनी सांगितले आहे.
मांगोबा मंदिराचे वैशिष्ट्य –
ज्योतिषशास्त्री लोकांना गृहदोष, कुळदोष व सर्प दोषातून मुक्त करण्यासाठी मांगोबा मंदिरात दर्शनासाठी पाठवतात. अनेकांना मांगोबांच्या दर्शनाने प्रचिती आली आहे. ज्या तरुण – तरुणींचे लग्न जमत नाही असे ह्या मंदिरात दर्शनासाठी येतात, आणि अनेकांना त्याचा अनुभव देखील आला असल्याचे सांगितले जाते. संत्तान प्राप्ती किंवा मूल लवकर बोलत नाहीत अश्यांनाही देव दर्शनाने फरक पडला असल्याचे मंदिर पुजाऱ्यांनी सांगितले.
मांगोबा मंदिराचे महत्व –
या मंदिराचे रोजचे दर्शन घेतले तर उचित असते. परंतु ज्या लोकांचे लग्न जमत नाही, गृहदोष, पुत्र प्राप्ती अश्या समस्या असलेले भाविक मंगळवारी, शनिवारी आणि अमावस्या या दिवशी भक्त गण मोठ्या संख्येने येत असतात.
अशी झाली मांगोबा मंदिराची स्थापना –
सत्ययुगात राहू केतू यांचे अवशेष येथे सापडले होते. परंतु लोकांना ह्याची अधिक माहिती नसल्याने केतू अवशेष तसेच होते. परंतु त्यानंतर व्यंकटेश कुलकर्णी ( हवालदार काका) यांच्या तपस्येद्वारे पुण्य पावन केतू ग्रहाची माहिती १९८१ साली त्यांनी तेथील रहिवासी उद्धव पाटील यांना दिली. पुढे जाऊन उद्धव पाटील हे मंदिराचे सेवेकरी झाले. पुढे जाऊन त्यांचा वारसा राजीव उद्धव पाटील यांनी चालवला. अशी माहिती सध्याचे मंदिर पुजारी अमोल पाटील यांनी दिली आहे.
राहू ग्रहाचे मंदिर दिल्लीत असल्याचे सांगितले जाते तर केतू ग्रहाचे मंदिर सोलापुरातील बाळे परिसरात मांगोबा मंदिर या नावाने प्रचलित आहे.
राहू म्हणजे सूर्यग्रहण तर केतू म्हणजे चंद्रग्रहण आहे. सूर्य आत्मबळ वाढवतो आणि चंद्र मनोबल वाढवतो. अश्याच ह्या दोन ग्रहांना राहू – केतू ग्रहण लावत असतात. म्हणून ह्यांच्या दर्शन मात्रे भाविकांचे आत्मबल, मनोबल वाढत असते. भारतात वर्षातून एकदा तरी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण येत असते.
दीपपूजन आषाढी अमावस्या दिवशी केतू ग्रह पुण्यपावन दिन महात्मा मांगोबा पुण्यतिथी निमित्त सर्व भाविक भक्तांना व पुजारी हस्ते देवाला महाअभिषेक व महपूजा केली जाते. तसेच भाविकांना अन्नदान व महाप्रसादाचे वाटप केले जाते. केतू स्थानाच्या दर्शनाने अनेकांना प्रचिती झाल्याचे भाविक आपापल्या अनुभवातून सांगत असतात. लोकानुभवातून दिवसेंदिवस लोकांची दर्शनासाठी गर्दी होत असल्याचे दिसत आहे. श्री क्षेत्र खंडोबा यात्रेसाठी येणारे भाविक सरास मांगोबांचे दर्शन घेऊनच जातात.
⁃ अमोल राजीव पाटील, मंदिर पुजारी