Ladki Bahin Yojna :
प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकदम मिळाले. आता निवडणूक संपली, निकाल लागला, आचारसंहिताही संपली, नवीन सरकार सत्तेवर बसले, तरीदेखील डिसेंबरमधील दीड हजार रुपये कधी मिळणार, याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे.
आता दरमहा २१०० रुपये नंतर द्या, पण तूर्तास १५०० रुपये मिळावेत, अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे.
आता निवडणूक संपली तरीदेखील ना दीड हजार रुपये ना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणीच स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, आता सत्ता स्थापना, हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) दोन हप्ते मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.