छत्रपती शाहुराजे प्रतिष्ठान चा उपक्रम

सोलापूर – विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने छत्रपती शाहू राजे प्रतिष्ठान च्या वतीने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार प्रेरणाभूमी ट्रस्ट, रयत शिक्षण संस्था संचलित रावजी सखाराम हायस्कूल , सोमपा शाळा क्र.११ या शैक्षणिक संस्थांना एक वही आणि एक पेन देऊन डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारावर अभिवादन करण्यात आले . यावेळी सोलापुर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक योगेश पाटिल साहेब, संस्थेचे संस्थापक देवा उघडे , पोलीस इन्स्पेक्टर जाधव साहेब , सोलापुर रेल्वे विभागाचे जनसंपर्क निरीक्षक निरंजन मोरे साहेब,सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार साहेब , बी.आर न्युज चे संपादक मनिष केत साहेब , रावजी सखाराम हायस्कूल चे मुख्याध्यापक संतोष वालवडकर,संडे धम्म स्कूल च्या स्मिता आबुटे,मनपा ११नं.शाळेच्या शिक्षिका पाटील मॅडम,शशीकांत तळमोहिते , अतिश बनसोडे , अध्यक्ष शिल भोसले,सचिन मामा वाघमारे , कांत उघडे , शिलवंत काळे,अमर साळवे,युवराज बडेकर , महादेव वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित विद्यार्थांना संबोधताना पाटिल साहेब यांनी अत्यंत योग्य दिशेने मार्गदर्शन करीत बाबासाहेबांनी केलेल्या अमुल्य योगदानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले शिवाय आजच्या काळात बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे हे समर्पित उदाहरणे देऊन सांगितले.

शिवाय आदरांजली पर अभिवादन व्यक्त करताना संस्थापक देवा उघडे यांनी रेल्वेचे अधिकारी पाटिल साहेब यांनी काल ५ डिसेंबर रोजी रेल्वेने केलेल्या उत्तम नियोजनाचा उल्लेख केला. तसेच डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचे सोलापुर शी असणारे संबंध यातुन येणाऱ्या काळात सोलापुर रेल्वे स्थानक येथे “आंबेडकर बुक कॅफे” म्हणजेच बाबासाहेबांच्या साहित्याचे छोटे ग्रंथालय उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली , त्यावर प्रतिक्रिया देताना पाटिल साहेबांनी या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे अश्वासन दिले. यावेळी ,समाधान आबुटे,वैजु सुरवसे,विरसेन जाधव,दिपक बडेकर,मिनाज शेख, आकाश इंगळे, प्रविण गायकवाड,अतिश वाघमारे,सोहन बाबरे, शेखर उबाळे,रोहन बनसोडे,कल्याणी संकनवरू,राजदीप तळभंडारे, विशाल शेवाळे,शरद अष्टुळ, सचिन तळभंडारे,सोनु गायकवाड व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुराग सुतकर यांनी केले यावेळी बहुसंख्येने भिम अनुयायी उपस्थित होते.
