सोलापूर- संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पुणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय संस्कृत सुभाषित पाठांतर स्पर्धा नुकतीच हरीभाई देवकरण प्रशालेत संपन्न झाली. यामध्ये श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. यामध्ये इयत्ता ९वी गटातून मानसी सुरेश भिंगारे व राजलक्ष्मी रविंद्र महामुनी यांनी अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक प्राप्त केला. इयत्ता १०वी गटातून साक्षी विनोद रोकडे व दिपाली संजय आयतोडे यांनीही अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक मिळविला. यामधील प्रथम क्रमांक प्राप्त दोघींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांना प्रशालेतील संस्कृत सहशिक्षक विजयकुमार काळेगोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी व सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक राजकुमार काळे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.