सोलापूर – वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे सदस्य संतोष धाकपाडे आणि सुरेश क्षिरसागर हे पक्षी निरीक्षणाला हिरज परिसरात गेले असता. केगाव येथे पंडित दीनदयाल महाविद्यालयच्या पाठीमागून त्यांनी पक्षी निरक्षणास सुरुवात केली, सुरुवातीला त्यांना कारुण्य कोकिळाचे दर्शन झाले त्यानंतर काही वेळाने कंठी होला, बुलबुल, वटवट्या, दयाळ, शिंजीर, भारद्वाज वेडा राघू या पक्षांचे दर्शन मिळाले. काही अंतर पुढे गेला असता त्यांना एका झाडावरती त्यांना एक दुर्मिळ प्रजातीचा पक्षी दिसून आला. बुलबुल पक्षी पेक्षा थोडा मोठा आणि कोकिळेपेक्षा थोडा लहान असा एक पक्षी त्यांना दिसला. त्या पक्षाची हालचाल थोडी वेगळीच होती त्यामुळे संतोष धाकपाडे आणि सुरेश क्षिरसागर हे दोघे त्या पक्ष्या कडे पाहत राहिले यांना हा पक्षी जरा वेगळा वाटला म्हणून नीट निरीक्षण केले असता तो पक्षी शेंडीवाला कोतवाल आहे समजले. अशी माहिती वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे सदस्य संतोष धाकपाडे यांनी दिली आहे.
या अगोदर हा पक्षी म्हणजेच शेंडीवाला कोतवाल २०२१ रोजी स्मृति उद्यानात दिसला होता त्यावेळी सोलापूरचे पक्षी अभ्यासक शिवानंद हिरेमठ, रत्नाकर हिरेमठ, अभिषेक कुलकर्णी, महादेव डोंगरे आणि सुरज धाकपाडे यांनी तो पाहिलेला होता. सोलापुरात आतापर्यंत कोतवालच्या चार उपप्रजाती आढळून आले आहे.त्यामध्ये काळा कोतवाल, पांढऱ्या छातीचा कोतवाल, राखाडी कोतवाल आणि शेंडीवाला कोतवाल
शेंडीवाला कोतवाल याचे अधिवास दाट जंगलात आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मध्यम आकाराचा त्याच्या डोक्यावर केसासारखी दिसणारी लांब पिसे असतात. ही पिसे सहजपणे दिसून येत नाहीत. चोच लांब, जाड आणि थोडीशी बाक असते. शेपटीच्या टोकाची पिसे वरच्या बाजूला अधिक वळलेली, रंगाने काळा असून शरीरावर प्रकाश पडल्यानंतर चमकदार उठून दिसतो.
कोट – हा पक्षी बांगलादेश चीन भूतान इंडोनेशिया आणि भारतातल्या काही भागात दिसतोय
डोक्यावर केसासारखी दिसणारी लांब पिसे असतात म्हणून त्याला शेंडीवाला कोतवाल असे म्हणतात. महाराष्ट्रात २ ते ३ वेळा दिसून आला आहे. या पक्ष्याची फारशी रेकॉर्ड नाही त्यामुळे जास्त काही माहिती नाही.
– वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे सदस्य संतोष धाकपाडे