सोलापूर –
बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलय.यावेळी मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
या हत्या कांडातील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाई करावी. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतील आरोपी हे मुंडे बहीण-भावाचे समर्थक असल्याने या खटल्याचा तपास होवून charshit जो पर्यंत दाखल होत नाही तो पर्यंत मुंडे भावा बहिणीचा मंत्रीमंडळात समावेश करू नये.अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली.
आज च्या बीड बंदला सोलापूर जिल्हातील सकल मराठा समाजाचा पाठिंबा असून मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सकल मराठा समाज उभा असल्याची ग्वाही यावेळी मराठा आंदोलकांनी दिली.