शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने आंदोलन
सोलापूर-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुक्यातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध व निदर्शने कार्यक्रम आयोजित केला आहे त्याअंतर्गत सोलापूर शिवसेनेच्या वतीने सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून नंतर निदर्शने करण्यात आली “ना. अमित शहा माफी मागा “अमित शहा यांच्या संसदेतील विधानाचा निषेध व धिक्कार असो” अशा घोषणासह पार्क चौक दणाणून सोडला. याप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांनी वादग्रस्त विधानाचा धिक्कार करीत भाजपच्या दलित व मागासवर्गीयांच्या विरोधी भूमिकेचा समाचार घेतला. भारत देश महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील तरतुदीप्रमाणे चालत असून या विधानाने देशातील कोट्यावधी भीमसैनिक, शिवसैनिक, मागासवर्गीय व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असून डॉक्टर बाबासाहेबांचे नाव घेणे हे फॅशन नसून ही संस्कृती आहे त्या नावात प्रचंड शक्ती असून भारत देश सार्वभौम झाला आहे. असे असताना श्री अमित शहा यांच्या अनुदगारामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा व देशातील नागरिकांचा अवमान झाला असून त्यांनी माफी मागावी अन्यथा भीमसैनिक व शिवसैनिक रस्त्यावर येऊन उग्र आंदोलन करतील असे प्रतिपादन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सर्व शिवसेनेचे पदाधिकार्यांनी गुलाब पुष्प अर्पण करून संपन्न झालेल्या या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, उत्तर विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड, संघटक प्रकाश चव्हाण, जरगीस मुल्ला, विडी कामगार सेनेच्या श्रीमती पद्मा म्हंता, यंत्रमाग कामगार सेनेचे अजय खांडेकर, उपशहर प्रमुख चंद्रकांत मानवी, दत्ता खलाटे, शिवा ढोकळे, जगदीश कलकेरी, लहू गायकवाड, सुधीर संगेपांग धनराज जानकर, ओंकार चव्हाण, बंटी बेळमकर, विभाग प्रमुख सुरेश जगताप, सुरेश शिंदे, अण्णा गवळी, आबा सावंत, दीपक दळवी, मारुती खानापुरे, राहुल परदेशी, किरण रामटेके, महेश गवळी, कैलास जाधव, आतिश म्हेत्रे, राजू कोत्ता, अतुल नागमोडे, उमेश वाघचौरे, राजू पानगावकर, युवासेना उपजिल्हाधिकारी राम वाकसे, युवतीसेना जिल्हाधिकारी पूजा खंदारे आदी उपस्थित होते.