सोलापूर :- केगाव येथील पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये गुरुकुल च्या टॉयलेट मध्ये एक साप असल्याची माहिती पोलीस नाईक शिवाजी भोसले यांनी WCAS चे सदस्य योगेश चौरे यांना दिली पण चौरे हे काही कामानिमित्त बाहेर गावी असल्याने त्यांनी कॉल ट्रान्स्फर करून WCAS चे उपाध्यक्ष सुरेश क्षीरसागर यांना कळविली. कार्यतत्पर असणारे सुरेश क्षीरसागर व प्रवीण गावडे लगेच घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता टॉयलेटच्या भांड्यामध्ये एक भला मोठा नाग प्रजातीचा विषारी साप साधारण पाच फुट लांबीचा फडी काढून फुस्कारत भांड्यात उभा होता.
WCAS चे क्षीरसागर यांनी त्या नागाला टॉयलेटच्या भांड्यातुन बाहेर काढण्यासाठी एका हातात एक लांब सळई वाकडी करून घेतली व दुसऱ्या हातात स्टिक घेऊन अलगद उचलून त्या नाग प्रजातींच्या विषारी सापाला सुरक्षितरित्या एका कापडी पिशवीत बंद केले. त्यावेळी पोलीस ट्रेनिंग सेंटर केंगाव मधील पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला अशी माहिती वाईल्डलाइफ काँझर्वेशन असोसिएशन उपाध्यक्ष सुरेश क्षीरसागर यांनी दिली आहे .
क्षीरसागर यांनी त्या नाग प्रजातीच्या विषारी सापाची अभ्यासपूर्ण माहिती दिली WCAS च्या कार्याचे कौतुक केले या बचाव कार्यामध्ये सुरेश क्षीरसागर व प्रवीण गावडे , पोलीस नाईक शिवाजी भोसले यांनी सहभाग घेतला.