डॉ. बाबासाहेब का अपमान नही सहेगा हिंदुस्थान, अमित शहा माफी मांगो, घोषणा देत “मैं भी आंबेडकर” प्रतिमा हातात घेऊन खासदार प्रणिती शिंदे सह इंडिया आघाडी खासदारांचा सहभाग
गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. याविरोधात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात अमित शहा यांनी माफी मागावी,
पंतप्रधान नरेंद्र मोदींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सन्मान असेल तर अमित शहा यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढून टाकावे या मागणीसाठी “मैं भी आंबेडकर” असे प्रतिमा घेऊन संसदेच्या कंपाऊंड वर चढून आक्रमक होऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात इंडिया आघाडीचे खासदार सहभागी झाले होते.