सोलापूर – भोगाव येथून संतोष घोडके यांचा फोन WCAS चे सदस्य लखन भोगे यांना आला. घोडके यांनी फोनवरून माहिती दिली की आमच्या अंगणात एक साप आलेला आहे तुम्ही तात्काळ आमच्याकडे साप पकडायला या.
क्षणाचा ही विलंब न करता लखन भोगे आणि प्रवीण गावडे हे घटनास्थळी पोहोचले. डब्लू सी ए एस चे सदस्य येईपर्यंत तो साप अंगणात असलेल्या एका बिळामध्ये जाऊन तो बसला. घोडके यांनी तो साप कुठे गेला आहे ते सांगितले. भोगे आणि गावडे हे दोघे मिळून ते बिळा मध्ये बोरच्या सहाय्याने पाणी सोडले. साधारण वीस ते पंचवीस मिनिटानंतर हळूच एक साप बिळातून तोंड बाहेर काढून बाहेर आला. तो साप तोंड बाहेर काढताच डब्लू सी ए एसच्या सदस्यांनी त्या सापाला ओळखले, तो साप नाग प्रजातीचा होता.
साप बिळातून बाहेर आल्यानंतर त्याला पिशवीमध्ये बंद करत असताना अजून एक साप त्याच बिळातून बाहेर येताना दिसला. तो पण साप नाग प्रजातीचा होता. भोगे आणि गावडे यांनी त्या दोन्ही सापाला सुरक्षितरित्याn सदस्य लखन भोगे, प्रविण गावडे, संतोष घोडके, नवनाथ गोरे, बाळू भाकरे इत्यादींनी सहभाग नोंदविला