
सोलापूर :
माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त देशमुख पाटील वस्ती अमराई येथे एम.जी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच मेडिकेअर ब्लड बँक सेंटर यांच्या सहकार्याने या शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले. यावेळी मंडळाचे संस्थापक मुन्ना गाडे , संजय गायकवाड, अमोल बंगाळे, सचिन शिराळकर, महेश जाधव, अमर कांबळे,महेश डोलारे, आकाश मुदगल यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाचे सदस्य आकाश जाधव, अभिषेक होवाळ, अरविंद कोटा, बाबासाहेब जेटीथोर, प्रथमेश जेटीथोर,किरण शिवशरण, असिफ पिरजादे, सचिन गिरीजी, नागेश शिराळकर, सागर जेटी थोर, तम्मा खानापुरे, शेखर कांबळे, आदींनी परिश्रम घेतले.