विनोदवीर प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल
सोलापूर – मराठमोळा विनोदवीर प्रणित मोरेला 2 फेब्रुवारी रोजी सोलापुरात मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रणित मोरेला सोलापूर पोलिसांनी संपर्क करून माहिती घेतलीय. सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यामध्ये तन्वीर शेख आणि अन्य 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्या 10 जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 115, 191, 189 आणि 19 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दहा आरोपी पैकी 5 जणांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित हॉटेलच्या मॅनेजरच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी दिली आहे.

याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सोलापूर पोलिसांकडून देण्यात आलीय.
वीर पहारिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वीर पहारिया या अभिनेत्यावर प्रणित मोरे ने विनोद केला होता.त्यावरून त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती प्रणित मोरे यांनी त्याच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केलीय.