सोलापूर जिल्ह्यामध्ये रमाई सेवाभावी बहुउद्देशिय सामाजिक शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर ही संस्था गेल्या २० वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने आजपर्यंत विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम गिरी केलेल्या महिलांचा करण्यात येणार आहे. त्यासाठी माता रमाईच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने ‘रमाईची लेक’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार समारंभ सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ६ वा निर्मलकुमार फडकुले सभागृह या ठिकाणी संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी शहर मध्यचे आमदार मा. देवेंद्र कोठे, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, जेष्ठ साहित्यीक दत्ता गायकवाड, राज्य उत्पादन शुल्कच्या भाग्यश्री जाधव, संशोधक डॉ. माशाळकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमात खालील महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रशासकीय सेवा: सारिका आकुलबार (नगर अभियंता सो.मा.पा), संजीवनी व्हट्टे (पोलिस), अमृता देशमुख (निरिक्षक आर.टी.ओ.), अश्विनी शिंगे (अधिक्षक बालगृह), उत्कृष्ट नगरसेविका वंदना गायकवाड (नगरसेविका), क्रीडा जान्हवी चंदनशिवे (योगा) समाजसेवा अंजना गायकवाड. (व्याख्यात्या), आरोग्य सेवा डॉ क्षितिजा पैके (नेत्रतज्ज्ञ), आशालता मस्के (आशा वर्कर), उत्कृष्ट पत्रकार :- अश्विनी तडवळकर (पत्रकार), आदर्श माता जमुना लोंढे यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व माता रमाईचे चरित्र असे असणार आहे.या पत्रकार परिषदेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ माने, सचिव विनोद माने, संजय बनसोडे, शंकर शिंदे, संतोष कदम हे उपस्थित होते.