Amit Shah :
कोलकातामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या आणि खूनाच्या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील सर्व पोलीस दलांना निर्देश जारी केलेल आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी दुपारी दिलेल्या निर्देशानुसार, आता पोलिसांना दर दोन तासाला आपल्या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा एक रिपोर्ट गृह मंत्रालयाला पाठवावा लागणार आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना हे बंधनकारक असेल.
कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचललं आहे. या आदेशा मध्ये सततच्या अपडेट वर भर देण्यात आला असून सर्व पोलिस दलांना E – mail, Fax किंवा Whatsapp द्वारे मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला माहिती पुरवावी लागेल.
देशात कुठे काय घडते आणि त्यावर त्वरित पाऊल उचलता यावे या दृष्टीकोनातून हे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत. कोलकाता मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर हा आदेश काढण्यात आला आहे.