man marathi news,
प्रतिनिधी –
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स वाढला आहे. लोकसभेत 48 पैकी 31 जागा मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीत कमीत कमी 160 जागा मिळतील, असे महाविकस आघाडीचे नेते सांगत आहेत. मात्र, विधानसभेच्या अडीच तीन महिने आधीच आलेल्या TIMES-MATRIZE च्या सर्व्हेने आघाडीची धाकधूक वाढणार आहे. या सर्व्हेनुसार राज्यात पुन्हा एकदा भाजपच मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज आहे.
या वर्तवलेल्या सर्व्हेनुसार भाजपा (BJP) १०५ जागांवर निवडून येऊन भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात आता निवडणुका झाल्या तर कोणता पक्ष सरशी ठरणार याबाबत चा अंदाज या सर्व्हेतून वर्तवला जात आहे. या अंदाजानुसार महायुतीतील भाजपाला ९५ ते १०५ जागा मिळतील. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांच्या पक्षाला १९ ते २४ जागांवर विजयी होतील. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) ७ ते १२ जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे.