सोलापूर महानगरपालिका क्रिडा विभाग व सोलापूर जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कुमठा नाका क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या शहरस्तरीय धनुर्विदया स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलींच्या इंडियन राऊंड प्रकारात अश्वथ क्रिडा प्रबोधिनी ची विद्यार्थिनी कु. विदया विजय लोहार (बी.एफ. दमाणि प्रशाला) हिने प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थिनीस अश्वथ क्रिडा प्रबोधिनी च्या प्रशिक्षक कु. ऐश्वर्या सावंत यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनीस पुढील वाटचालीसाठी इरफान शेख सर (समाधान विद्यालय, दहिटणे, सोलापूर) यांनी शुभेच्छा दिल्या.
सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक (दि. १६) रविवारी रोजी सायंकाळी आठ वाजता,...
Read more