अखेर ब्राह्मण समाजाच्या लढ्याला यश ; भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर. 50 कोटी रुपयांची महामंडळासाठी तरतूद
मुंबई – आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावे ही मागणी आज राज्य सरकारने तातडीने मंजूर करत ब्राह्मण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्षापासून समस्त महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समाजाची मागणी होती. हे ब्राह्मण समाजाला भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावे, व इतर अशा इतर मागण्यांसाठी गेले अनेक वर्ष ब्राह्मण समाज आंदोलन करून राज्य सरकारकडे आपली मागणी करत होता आदाखेल राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये भगवान परशुराम आर्थिक विकास मंडळ मंजूर करण्यात आले 2018 साली मुंबईच्या आझाद मैदानावरती भव्यदिव्य असे आंदोलन प्रा काकासाहेब कुलकर्णी यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. त्यावेळी हजारो समाज बांधवांसह मोठ्या आंदोलनाची हाक यावेळी देण्यात आली होती आंदोलना झाली अखेर माझ्यासह ब्राह्मण समाजाचे नेते बाजीराव धर्माधिकारी, निखिल लातूरकर, दीपक रणवरे , मकरंद कुलकर्णी, विश्वजीत देशपांडे, सुरेश मुळे, सचिन वाडे पाटील, गजानन जोशी, अर्चना सरुडकर, संजीवनी पांडे, विजया कुलकर्णी यांच्यासह अनेक समाज बांधवांनी वेळोवेळी प्रयत्न केले. अशी माहिती प्रा. काकासाहेब कुलकर्णी, समन्वयक , समस्त ब्राम्हण समाज महाराष्ट्र यांनी दिली.